Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याची गंभीर घडना घडली आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार, दि. २ मे रोजी ही घटना घडली.
शिवाजी मारुती वाघवले (वय 34 ) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चांद नौषाद शेख (वय 19) याने मंदिरात प्रवेश करून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली. यावेळी आरोपीने मंदिराचे गेट बंद करून मूर्तीला खाली पाडले. या घटनेनंतर चांद शेख याचे वडील नौषाद शादाब शेख (वय 44 ) यांनी उपस्थित लोकांना उद्देशून “तूम हिंदू लोक आमचं काहीच करू शकत नाहीत” असे धमकीचे उद्गार काढल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
- पौड येथील नागेश्वर मंदिर व मशिदीला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त देण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करत असून पोलिस निरीक्षक घुले यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून गावकऱ्यांना गाव बंदची हाक दिली आहे. तर सकल हिंदू समाजाकडून रविवारी मुळशी बंदची हाक देण्यात आली आहे.
‘गावात शांततेचे वातावरण आहे, लोकांनी सोशल मीडियावरती अफवा पसरवू नये, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोसावी यांनी दिली.
( Desecration of Goddess idol in Nageshwar temple of Paud Mulshi Case registered CCTV video viral )
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News

