Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार हभप दिलीप महाराज खेंगरे यांची शिवसेना पक्षाच्या शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना पुणे जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये खेंगरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये खासदार श्रीकांत शिंदे व संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी हभप दिलीप महाराज खेंगरे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
या पदाच्या माध्यमातून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व. आनंद दिघे यांची शिकवण व हिंदुत्ववादी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवत शिवसेना पक्ष वाढीसाठी आणि हिंदुत्ववादी विचाराचा प्रचार प्रसारासाठी कार्य करावे, असे नियुक्तीपत्रात नमूद आहे.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News