Dainik Maval News : शासकीय कार्यालयातील कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक व्हावे, तसेच जनतेच्या तक्रारींचे निराकरण तत्परतेने व्हावे आणि शासकीय योजनांचा प्रचार व प्रसिद्धी गावपातळीपर्यंत व्हावी अशा उदात्त हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम निश्चित केला होता.
राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत मावळ तालुका पंचायत समितीने चमकदार कामगिरी केली असून सात कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. यात शासकीय योजनांचा प्रचार व प्रसिद्धी गावपातळीपर्यंत व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले, ज्या अंतर्गत आदिवासी बांधवांकडून घरकुलांचे चारशे प्रस्ताव प्राप्त झाले आहे.
शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत मावळ पंचायत समितीने आदिवासी व कातकरी बांधवांना स्वतःचे घर मिळावे यासाठी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक चारशे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील यांनी याबाबत मावळ पंचायत समितीचे कौतुक केले आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे अन्य अधिकारी, कर्मचारी वर्गाने केलेल्या कामाचे हे यश आहे.
अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link