Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मिलिंद युवक मंडळ व संघमित्रा महिला मंडळाच्या वतीने ११ व १२ मे रोजी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे यांनी दिली.
महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवात रविवारी (दि. ११) सकाळी ९.३० वाजता बुद्धविहार येथे त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदना आदी कार्यक्रम होतील. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर होईल. या शिबिरात सर्व आजारांच्या तपासण्या व आयुर्वेदिक औषधे वाटप होईल. डॉ. प्रवीण बढे यांच्या सहकाऱ्याने हे शिबिर होईल.
सायंकाळी सात वाजता ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते संजय आवटे यांचे ‘लोक उत्थानाची गाथा’ या विषयावर व्याख्यान होईल. रात्री नऊ वाजता शाहीर अजिंक्य लिंगायत व सहकाऱ्यांचा शाहिरी भीम वंदना हा कार्यक्रम होईल. सोमवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता बुद्ध विहारात बुद्धवंदना व अभिवादन सभा होईल.
त्यानंतर सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भारत विठ्ठलदास हे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत चमत्कार प्रात्यक्षिके सादर करून व्याख्यान देतील. सायंकाळी पाच वाजता भगवान गौतम बुद्ध व महापुरुषांच्या प्रतिमांची मिलिंद नगर ते पंचायत समिती या मार्गावर भव्य मिरवणूक होईल. पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link