Dainik Maval News : दक्षिण-पश्चिम मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिली. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यंदाचा मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा आधी म्हणजेच 13 मे रोजी या भागात पोहोचला आहे. गेल्या सात वर्षांत सर्वात लवकर मान्सून आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सामान्यतः दक्षिण अंदमान समुद्र आणि पोर्ट ब्लेअरमध्ये 21 मे रोजी दाखल होतो. पण यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे.
हवामान विभागाने सांगितलं की, पुढच्या तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, उर्वरित अंदमान समुद्र आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये दाखल होईल. सध्या मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट :
सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वर्धा, वाशीम, गोंदिया, भंडारा, अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाने केला आहे. एकूणच यामुळे यंदा महाराष्ट्रातही मान्सून लवकर पोहोचण्याचे चिन्ह आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई