व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आनंदाची बातमी : मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट । Monsoon Update

दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, आणि निकोबार बेटांवर मान्सून धडकला असल्याची माहिती भारताच्या हवामान खात्याने दिली आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 14, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश
Monsoon-Update

File Image


Dainik Maval News : दक्षिण-पश्चिम मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिली. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यंदाचा मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा आधी म्हणजेच 13 मे रोजी या भागात पोहोचला आहे. गेल्या सात वर्षांत सर्वात लवकर मान्सून आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सामान्यतः दक्षिण अंदमान समुद्र आणि पोर्ट ब्लेअरमध्ये 21 मे रोजी दाखल होतो. पण यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे.

हवामान विभागाने सांगितलं की, पुढच्या तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, उर्वरित अंदमान समुद्र आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये दाखल होईल. सध्या मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट :
सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वर्धा, वाशीम, गोंदिया, भंडारा, अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाने केला आहे. एकूणच यामुळे यंदा महाराष्ट्रातही मान्सून लवकर पोहोचण्याचे चिन्ह आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई


Previous Post

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ । Pune News

Next Post

टाकवे बुद्रुक येथील जे.एस.डब्लू. कंपनीसमोर दुचाकीची कंटेनरला धडक, चालक जागीच ठार – घटना सीसीटीव्हीत कैद । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
One killed on spot after container hits Takve Budruk Maval Incident captured on CCTV

टाकवे बुद्रुक येथील जे.एस.डब्लू. कंपनीसमोर दुचाकीची कंटेनरला धडक, चालक जागीच ठार - घटना सीसीटीव्हीत कैद । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.