Dainik Maval News : Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र तुकाराम हगवणे याने गुन्हा घडल्यानंतर पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत पोलीस तपासापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने अनेक लॉज, फार्महाऊस, मित्रांची घरे तसेच हॉटेल्समध्ये मुक्काम करत स्थानिक मदतीच्या आधारे ठिकाणे बदलली. पोलीस तपासात हा संपूर्ण प्रवास उघड झाला असून, पोलिसांकडून त्याला मदत करणार्यांची कसुन चौकशी होणार आहे.
सून वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर राजेंद्र हगवणे आपल्या मुलाला घेऊन औंध येथील रुग्णालयात गेला. तेथून त्याचा प्रवास मुळशीमधील मुहूर्त लॉन्स मार्गे वडगाव मावळकडे झाला. यानंतर त्याने पवना डॅम परिसरातील एका खासगी फार्महाऊसवर आश्रय घेतला. त्याठिकाणी त्याचा मुक्काम होता. त्यानंतर त्याने आळंदीतील लॉजवर मुक्काम केला होता. ही सर्व ठिकाणे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात असून गर्दीपासून दूर असल्यामुळे त्याला पोलीस तपासापासून लपून राहण्यास मदत झाली.
- दरम्यान, 18 मे रोजी पुन्हा तो कार बदलून वडगाव मावळ भागात गेला. त्यानंतर एका बेळगाव (कर्नाटकमधील) नोंदणी असलेल्या गाडीतून त्याने प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. 19 मे रोजी सातार्यातील पुसेगाव येथील अमोल जाधव याच्या शेतावर गेला. त्यानंतर पसरणी मार्गे तो थेट कोगनोळीकडे रवाना झाला. हॉटेल हेरिटेजमध्ये ते दोन दिवस थांबले होते. या काळात तो सतत गाडी बदलत होता; तसेच मोबाईल बंद ठेवून संवाद टाळत होता. यामुळे पोलिसांना त्याचा मागोवा घेणे अवघड गेले. अखेर 22 मे रोजी तो पुण्यात परतत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
या संपूर्ण पलायनात राजेंद्र हगवणे याला कोणत्या- कोणत्या व्यक्तींची मदत मिळाली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथक नियुक्त केले आहे. यामध्ये वाहन उपलब्ध करून देणारे, लॉज किंवा हॉटेल्समध्ये विनानोंद मुक्काम करू देणारे, आर्थिक मदत करणारे तसेच मार्गदर्शन करणारे अशा चार ते पाच जणांची चौकशी सुरू आहे. काहींना समन्स बजावण्यात आले असून, लवकरच वरिष्ठ अधिकार्यांसमोर जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन