व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू ; जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला माहिती पाठवली । Pune News

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 26, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
Pune Zilla Parishad

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याआधी जिल्हा परिषदेची गट आणि पंचायत समिती गणरचना निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने पुणे जिल्ह्याची तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्येची माहिती मागवली. जिल्हा प्रशासनाने ही माहिती ग्रामीण विकास विभागाकडे सादर केली आहे.

  • जिल्हा प्रशासनाने 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येची आकडेवारी राज्य सरकारला पाठवली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग म्हणजे महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड वगळता, ग्रामीण भागाची लोकसंख्या 31 लाख 48 हजार 456 इतकी आहे. ही लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे 75 गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी गटांची संख्या ठरविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक लोकसंख्येची माहिती जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सुपूर्त केली आहे.

संपूर्ण राज्यासाठी जिल्हा परिषदांच्या गटसंख्येची मर्यादा लोकसंख्येनुसार ठरवली असून, कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 गट ठेवण्याचे निर्देश आहेत. प्रत्येक गटात 2 पंचायत समिती गण असतील, असे ठरविण्यात आले आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांविषयी निर्णय देताना 2022 पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर 2022 मध्ये जी गटसंख्या होती, तीच कायम राहणार आहे. त्यानुसार पुण्यासाठी गटांची संख्या 75 राहणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागाने 2011 मधील तालुकानिहाय लोकसंख्येची माहिती मागवली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ही माहिती शासनाकडे पाठवली आहे.

2011 नंतर 6 लाख 29 हजार लोकसंख्येची घट
2011 मध्ये ग्रामीण भागात 31 लाख 48 हजार 456 लोकसंख्या होती. त्यानंतर पुणे महापालिकेत 23 गावे समाविष्ट झाली तसेच वडगाव मावळ, देहू, बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव येथे नगरपंचायती स्थापन झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येत 6 लाख 29 हजार 964 इतकी घट झाली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात अतिमुसळधार पाऊस ! एकाच दिवसात तब्बल २३३ मि.मी. पावसाची नोंद, धो-धो पावसाने नागरिकांची तारांबळ

Next Post

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : राजेंद्र हगवणेला मदत करणारे पोलिसांच्या रडारवर, कसून चौकशी सुरू । Vaishnavi Hagawane Case

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vaishnavi Hagawane suicide case

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : राजेंद्र हगवणेला मदत करणारे पोलिसांच्या रडारवर, कसून चौकशी सुरू । Vaishnavi Hagawane Case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.