Dainik Maval News : तीर्थक्षेत्र देहूगाव ते देहूरोड दरम्यान पालखी मार्गाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे आणि अतिरिक्त गतीरोधकांमुळे पावसाळ्यात वाहन चालकांना वाहन चालविताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी पायी वारी ३४० पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देहूपासून पालखी पुढे जाताना देहू ते देहूरोड दरम्यानचा रस्ता हाच प्रमुख पालखी मार्ग आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच थोड्या थोड्या अंतरावर असणारे गतिरोधक यामुळे नागरिकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते.
तसेच सायंकाळनंतर हा रस्ता पूर्णतः अंधारात असतो त्यामुळे नवख्या वाहन चालकांना भितीदायक ठरत आहे. ह्यामुळे वारकऱ्यांनाही त्रास सहन करावा लागू शकतो. देहूरोड, पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारा हा मार्ग वर्दळीचा असल्याने व लवकरच पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी याच मार्गावरून जाणार असल्याने हा रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway

