Dainik Maval News : मावळ तालुका कृषि अधिकारी पदी मारुती साळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी कर्तव्यावर हजर होत आपला कार्यभार स्वीकारला आहे.
- मावळ तालुका कृषि अधिकारीपदी मारुती साळे हे बदलीने हजर झाले आहेत. यापूर्वीचे तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ हे कृषि आयुक्तालयात बदली होऊन गेल्याने त्यांच्या जागी साळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत समुपदेशन बदल्या करण्यात आल्या. त्यात तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मावळ तालुका कृषि अधिकारी पदी हजर झालेले मारुती साळे ह्यांनी ह्या अगोदर हवेली तालुका कृषि अधिकारी पदावर काम केले आहे. मावळ तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मारुती साळे यांचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयात स्वागत केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश

