Dainik Maval News : मंगरुळ (ता. मावळ) येथे गट नंबर ३५ ते ४२ या परिसरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी मावळ महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. महसूल विभागाच्या पथकाने २५ वाहने जप्त केली असून तळेगाव एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जप्त केलेल्या वाहनांत ११ पोकलेन मशीन, मुरमाने भरलेले चार डंपर, रिकामे १० डंपर यांचा समावेश आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार अमोल पाटील, मंडल अधिकारी आणि महसूल खात्याच्या अन्य अधिकाऱ्यांनी केली.
वनखात्याच्या हद्दीत उत्खनन, वृक्षतोड
गट क्रमांक ४१ व ४२ हे वनक्षेत्रात मोडत असूनही त्याठिकाणी उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर वनखात्याच्याही चौकशीला सुरुवात झाली आहे. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, गौण खनिज उत्खननाबाबत येत्या तीन-चार दिवसांत सविस्तर अहवाल मिळणार असून त्यानंतर महसूल कायद्यानुसार तातडीने दंडात्मक कारवाई केली जाईल.
विधानसभेतही चर्चा
दरम्यान मंगरुळच्या या भागात होणाऱ्या उत्खनन प्रकरणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, गट क्रमांक ३५, ३६, ३७, ३८ हे खाजगी असून त्यांना १० वर्षांचा खाणपट्टा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ४१, ४२ आणि ४६ हे राखीव वनक्षेत्र असल्याने तिथे कोणतेही उत्खनन होणे कायदेशीर नव्हते. तरीही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याने विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक महिन्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे उत्तर दिले होते. त्यानंतर आता ही कारवाई कऱण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश । ahmedabad plane crash
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News

