व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात महसूल विभागाची मोठी कारवाई ! मंगरुळ परिसरात बेकायदेशीर उत्खनन ; २५ वाहने जप्त । Maval News

मंगरुळ (ता. मावळ) येथे गट नंबर ३५ ते ४२ या परिसरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी मावळ महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 13, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Revenue Department takes big action in Maval Illegal excavation in Mangrul area 25 vehicles seized

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मंगरुळ (ता. मावळ) येथे गट नंबर ३५ ते ४२ या परिसरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी मावळ महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. महसूल विभागाच्या पथकाने २५ वाहने जप्त केली असून तळेगाव एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जप्त केलेल्या वाहनांत ११ पोकलेन मशीन, मुरमाने भरलेले चार डंपर, रिकामे १० डंपर यांचा समावेश आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार अमोल पाटील, मंडल अधिकारी आणि महसूल खात्याच्या अन्य अधिकाऱ्यांनी केली.

वनखात्याच्या हद्दीत उत्खनन, वृक्षतोड
गट क्रमांक ४१ व ४२ हे वनक्षेत्रात मोडत असूनही त्याठिकाणी उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर वनखात्याच्याही चौकशीला सुरुवात झाली आहे. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, गौण खनिज उत्खननाबाबत येत्या तीन-चार दिवसांत सविस्तर अहवाल मिळणार असून त्यानंतर महसूल कायद्यानुसार तातडीने दंडात्मक कारवाई केली जाईल.

विधानसभेतही चर्चा
दरम्यान मंगरुळच्या या भागात होणाऱ्या उत्खनन प्रकरणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, गट क्रमांक ३५, ३६, ३७, ३८ हे खाजगी असून त्यांना १० वर्षांचा खाणपट्टा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ४१, ४२ आणि ४६ हे राखीव वनक्षेत्र असल्याने तिथे कोणतेही उत्खनन होणे कायदेशीर नव्हते. तरीही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याने विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक महिन्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे उत्तर दिले होते. त्यानंतर आता ही कारवाई कऱण्यात आली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश । ahmedabad plane crash
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime

Next Post

अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू ; पंतप्रधान मोदींकडून घटनास्थळाची पाहणी, जखमींची विचारपूस । Air India plane crash

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
265 people including passengers died in Ahmedabad plane crash PM Modi inspects scene interrogates injured

अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू ; पंतप्रधान मोदींकडून घटनास्थळाची पाहणी, जखमींची विचारपूस । Air India plane crash

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.