ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएल ची बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ( PMPML Bus Services In Rural Areas Of Pune District Will Continue Chandrakant Patil )
कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा देखील सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पीएमपीएमएल प्रशासनाकडे पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एसटी महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागात बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय #PMPML प्रशासनाने घेतला होता. मात्र ही बससेवा सुरू ठेवण्याची नागरिकांची मागणी होती. त्याची दखल घेऊन PMPMLचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना आज या भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या.
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) December 5, 2022
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला होता. पत्राच्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस 11 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून 12 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. पीएमपीएमएल प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा होणार आहे. ( PMPML Bus Services In Rural Areas Of Pune District Will Continue Chandrakant Patil )
अधिक वाचा –
– कौतुकास्पद उपक्रम! भोयरे शाळेतील 220 विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप
– वारंगवाडीत नागाला जीवदान, वन्यजीव रक्षक संस्थेचे सर्पमित्र प्रशांत भालेराव यांचे ग्रामस्थांकडून कौतूक – व्हिडिओ