Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील टाकवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे. शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता 5 वी मधील 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यामधील 2 विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीच्या जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये स्थान पटकावले आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुमारी हर्षल विकास असवले 258 गुण व कुमारी राधिका शांताराम माळी हीने 246 गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र धारक ठरल्या. या दोघींना प्रत्येकी 5000 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक अतुल गायकवाड व वर्ग शिक्षिका रुपाली गायकवाड यांनी वर्षभर सुट्टीच्या कालावधीमध्ये देखील विद्यार्थ्यांकडून कसून सराव करून घेतला, यामुळे विद्यार्थ्यांच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. याप्रसंदी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले.
यश मिळवलेल्या विद्यार्थीचा शाळेत सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच अविनाश असवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मालपोटे, विकास असवले, शांताराम माळी, सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंनी पैलू पाडून घडवला लख्ख हिरा ! दिग्गज गुरुंच्या छायेत एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आलाय
– मोठी बातमी! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा; राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा
– अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा