Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्यांचा पहिली ते बारावी वर्गातील प्रवेश हा अधिकृत आणि मान्यताप्राप्त शाळेतच घ्यावा, असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी केले आहे.
मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेने तालुक्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. सद्यःस्थितीत कामशेत आणि नांगरगाव (लोणावळा) येथील प्रत्येकी एक अशा दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा या अनधिकृत शाळा असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, असे गटशिक्षणाधिकारी वाळुंज यांनी सांगितले.
तसेच, पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश हा अधिकृत, मान्यता प्राप्त व यू-डीआयएसई क्रमांक असलेल्या शाळेतच घ्यावा. आपली फसवणूक होऊ देऊ नये, शाळेची चौकशी करावी, संपूर्ण माहिती घ्यावी आणि नंतरच पाल्याचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन देखील वाळुंज यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना