व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
Chief Minister Devendra Fadnavis inspects the Mumbai-Pune Missing Link project

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, राजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होईल. महामार्गावरील घाटाचा भाग यामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंदचा असून देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची १८५ मीटर आहे. देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याही ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते येथे काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News
– महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत
– देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा
– महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! ‘गणेशोत्सव’ महाराष्ट्र राज्याचा अधिकृत ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित


Previous Post

ट्रकमधील पाइप पडून दोन महिला ठार, लोणावळाजवळील बोरघाटात भीषण अपघात, पाच जखमी । Lonavala Accident

Next Post

मावळ तालुक्यातील ६५ शाळांमधील इयत्ता दहावीच्या वर्गात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा तळेगाव येथे सन्मान । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Students who came first in class 10th from 65 schools in Maval taluka were honored at Talegaon

मावळ तालुक्यातील ६५ शाळांमधील इयत्ता दहावीच्या वर्गात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा तळेगाव येथे सन्मान । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.