व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे क्षेत्र असल्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांसाठी पुरेशा निधीचा सातत्याने अभाव जाणवतो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 11, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
CM assures to provide funds for development works in Dehu Road Cantonment area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 10 जुलै) विधानभवन, मुंबई येथे कॅन्टोन्मेंट बोर्ड संदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. या विषयावर आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने लक्ष वेधल्याने व त्यांच्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

केंद्राच्या अखत्यारीतील क्षेत्र, पण राज्याकडूनही विशेष लक्ष
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे क्षेत्र असल्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांसाठी पुरेशा निधीचा सातत्याने अभाव जाणवतो. शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन यासारख्या मुलभूत गरजा अपुऱ्या राहत असल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी लवकरच विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, आणि केंद्राशी समन्वय साधून या भागाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील.

‘रेड झोन’मधील समस्यांबाबत लवकर निर्णय
देहूरोड परिसरातील ‘रेड झोन’ बाबत होणाऱ्या अडचणींचीही मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने दखल घेतली. नागरिकांना परवाने, बांधकाम संमती, सुविधा पुरवठा या बाबतीत येणाऱ्या अडथळ्यांवर लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. रेड झोनसारख्या अडचणींमुळे अनेक कुटुंबांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत.

पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा
श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर हा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग अधिक सुसज्ज आणि सुरक्षित करण्याबाबतही चर्चा झाली. या मार्गावर आवश्यक त्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासंदर्भात लवकरच काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. या निर्णयामुळे वारकरी संप्रदायासोबतच स्थानिकांनाही दिलासा मिळणार आहे.

आमदार सुनील शेळके यांचा ठाम आग्रह
या संपूर्ण बैठकीसाठी आमदार सुनील शेळके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देहूरोड कॅन्टोन्मेंटसारख्या महत्त्वाच्या भागात राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी त्यांची ठाम मागणी होती. याआधीही त्यांनी विधानसभा आणि शासनस्तरावर या विषयांकडे वारंवार लक्ष वेधले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आजच्या बैठकीत देहूरोडच्या अनेक प्रलंबित मागण्या चर्चेत आल्या आणि निर्णय प्रक्रियेला चालना मिळाली.

या बैठकीत संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. लवकरच निधी वितरण आणि अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंनी पैलू पाडून घडवला लख्ख हिरा ! दिग्गज गुरुंच्या छायेत एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आलाय
– मोठी बातमी! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा; राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा
– अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा


Previous Post

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! ‘गणेशोत्सव’ महाराष्ट्र राज्याचा अधिकृत ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित

Next Post

महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Important decision 15 day deadline for action against illegal housing projects in PMRDA areas

महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.