व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) परीक्षा मे च्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 11, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Pankaj Pimpre son of a rickshaw driver from Takve Khurd village in Maval taluka became a CA

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) परीक्षा मे च्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द या गावातील पंकज बाळासाहेब पिंपरे ह्या मुलाने अवघ्या वयाच्या २२व्या वर्षी सनदी लेखापाल (सीए) बनण्याचा मान मिळविला आहे.

  • पंकजची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. त्याचे वडील बाळासाहेब पिंपरे हे रिक्षा चालक आहे. पंकजचे शिक्षण हे टाकवे जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण लोणावळा येथे झाले. कोरोना काळात पंकजच्या कुटुंबावर आर्थिक महासंकट ओढवले, परीक्षेच्या नोंदणीसाठी पैसे नसल्यामुळे त्यांच्या घरच्यांना दागिने गहाण ठेवून फी भरावी लागली.

कोरोनामुळे सीए परीक्षा उशीरा झाल्याने त्याला अर्ज भरायला वेळ मिळाला. ह्या संधीचे सोने करत त्याने दोन महिन्यांत सीए फाउंडेशन ची परीक्षा पास केली. पुढे वैयक्तिक संघर्षाशी सामना करत सीए इंटर चे दोन्ही ग्रूप्स पहिल्या प्रयत्नात पास करून समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला. नोव्हेंबर २०२४ हा त्याचा सीए फायनल चा पहिला प्रयत्न होता.

परीक्षेआधी आठ दिवस आधी झालेल्या त्याच्या आजीच्या निधनानंतर पंकज डगमगून गेला. दुर्दैवाने त्याला त्याच्या आयुष्यातील प्रथम अपयश झेलावे लागले, पण जिद्द सोडली नाही. पुढचा प्रवास काट्याचा आहे, हे जाणून पंकज न डगमगता आपल्या पालकांच्या व आपले मॅनेजरच्या मदतीने अवघ्या दीड ते दोन महिन्यात पंधरा ते सतरा तास अभ्यास करत सीए फायनल परीक्षा देत दैदिप्यमान गुण मिळवत सीए पदवी प्राप्त केली आहे.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असली तरीही हार न मानता आपली जिद्द, चिकाटी, इच्छा शक्ती आणि संघर्षाचा सामना करत त्याने मिळवलेले यश हे कौतुकास्पद असून परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये त्याने नवी उमेद निर्माण केली आहे. त्याच्या या यशाबद्दल टाकवे ग्रामस्थांसह मावळ तालुक्यात त्याचे अभिनंदन होत आहे.

त्याच्या या यशामध्ये त्याचे वडील बाळासाहेब पिंपरे, आई सुजाता पिंपरे व त्याचे मित्र आणि मार्गदर्शक सीए गुरुदेव गरुड व सीए स्नेहल गरुड यांचा मोलाचा वाटा असल्याचे तो सांगतो. तसेच भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची तो इच्छा बाळगतो असे तो म्हणाला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News
– महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत
– देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा
– महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! ‘गणेशोत्सव’ महाराष्ट्र राज्याचा अधिकृत ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित


Previous Post

देहू – देहूरोड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश कांबळे; उपाध्यक्षपदी गणेश दुडम, प्रकल्प प्रमुखपदी रामकुमार आगरवाल

Next Post

अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Forts-In-Maharashtra

अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.