Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवना धरण आजमितीस (दि. 15 जुलै) 16.48 टक्के इतके भरले आहे. पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात पाण्याचा येवा सुरूच आहे, त्यामुळे जलसाठा नियंत्रणासाठी धरणातून दिनांक 4 जुलैपासून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होत नाहीये, परंतु नियंत्रित स्वरूपात 76.48 टक्के इतका पाणीसाठा सध्या धरणात आहे.
मावळ तालुक्यातील अनेक गावखेडी, तेथील पाणीयोजना आणि शेतीसाठी पवना धऱण हा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. तर, पिंपरी चिंचवड शहरासाठी पवना धरण हे पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार आहे. यासह अनेक लहान मोठ्या उद्योगांना पवना धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. जुलैच्या सुरुवातीलाच पवना धरण 75 टक्क्यांहून अधिक भरल्याने या सर्व घटकाची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
- पवना धरण क्षेत्रात विशेषतः धरणाच्या बॅकवॉटर भागात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरण क्षेत्रात चोवीस तासात तब्बल 55 मि.मी. इतका पाऊस नोंदविण्यात आला. यापेक्षाही धरणाच्या बॅकवॉटर भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. 1 जून पासून धरण क्षेत्रात 1369 मि.मी. इतका पाऊस झाला असून सद्यस्थितीत पवना धऱणात 76.48 टक्के इतका पाणीसाठा असून धरणातून 1800 क्युसेक इतका नियंत्रित विसर्ग सुरू आहे.
धरणातील पाण्याचा येवा लक्षात घेता धरणातून होणारा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो, नागरिकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात जाऊ नये, असे आवाहन धरण विभागाकडून करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना