Dainik Maval News : मावळ तालुक्यातील उर्से येथील घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी आठ दिवसांत उघडकीस आणला असून आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून 25 लाखांचे दागिने आणि मोटार हस्तगत केली आहे.
उर्से येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने आठ दिवसांत छडा लावला. आरोपींना जेरबंद करून २५ लाख ३२ हजार रुपये किमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने व मोटार जप्त केली.
शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या पथकाने समांतर तपास केला.
घटनास्थळापासून लोणावळ्यापर्यंतच्या सीसीटीव्हीच्या आधारे गुन्ह्यात मोटारीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपींचा शोध घेतला. देहूरोड ते गहुंजे रस्त्यावरील जंगलात त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान पाच जणांनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यशोदास राठोड (वय २७, ओझर्डे, ता. मावळ), रितेश राठोड (वय २७, वेहेरगाव, ता. मावळ), आकाश मैनावत (वय २९), ऋतिक मैनावत (वय २१, दोघे रा. भादस, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी