Dainik Maval News : तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दहीहंडी व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी तसेच शांतता कमिटी, महिला दक्षता समिती, पत्रकार, ग्राम सुरक्षा दल, व्यापारी उद्योजक समिती सदस्य यांच्यासाठी एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक शनिवार, दि. १९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, सुशीला मंगल कार्यालय, लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे होणार आहे. सण काळात शांतता, सुव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात येत असून, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) पिंपरी चिंचवड व मा. सहायक पोलीस आयुक्त (देहूरोड विभाग) या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सर्व संबंधित घटकांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आगामी सण काळात कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्व उत्सव सुरक्षित आणि अनुशासित पद्धतीने पार पडतील.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी