Dainik Maval News : मावळ तालुक्यातील औंढे गावातील खाडेवाडी येथे एका गाईच्या गोठ्यात 10 फूट लांबीचा अजगर आढळून आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी जात अजगरास पकडले व नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
या अजगराची माहिती स्थानिक नागरिक सोनु खाडे यांनी सर्पमित्र मोरेश्वर मांडेकर यांना दिली. त्यानंतर लोणावळा विभागातील सर्वात अनुभवी सर्पमित्र म्हणून ओळख असलेले सर्पमित्र शेळके उर्फ शेळके मामा यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत सुरक्षित पद्धतीने अजगराला पकडले. संपूर्ण रेस्क्यू काळजीपूर्वक पार पडल्यानंतर अजगराला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी सोनु खाडे, सर्पमित्र शेळके मामा, दिनेश खाडे, विलास कुंभार, ह.भ.प. संतोष महाराज घनवट, रामदास मेमाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबतची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी