Dainik Maval News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोणावळा शहरातील दीक्षाभूमीवरील पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथ्या टप्प्यातील सुशोभीकरणासाठी २ कोटी ५६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. लोणावळा नगरपालिकेच्या वतीने हे महत्वाकांक्षी काम हाती घेण्यात आले असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे यासाठी तांत्रिक मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
तांत्रिक मंजुरी प्राप्त होताच कामासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबविली जाईल आणि चौथ्या टप्प्यातील कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिली. यामध्ये अभियंता पंढरीनाथ साठे, बांधकाम विभागाचे संकेत ढोरे आदींचे विशेष सहकार्य लाभले.
या कामासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनील शेळके यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्याबद्दल समस्त आंबेडकरी समाज आणि रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मन: पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
सुशोभीकरणाच्या या टप्प्यानंतर पाचव्या आणि अंतिम टप्प्यात रमाई सांस्कृतिक भवनाची उभारणी आणि पुतळ्याभोवतीच्या परिसराचे अधिक आकर्षक स्वरूपात रूपांतर करण्यात येणार आहे. हे ऐतिहासिक कार्य १४ एप्रिल २०२६ पूर्वी पूर्ण होऊन पुतळ्याचे भव्य उद्घाटन समारंभ आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती आरपीआय (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी