व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ हद्दीतील ‘या’ चार ठिकाणी तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्याची शहर भाजपाची मागणी । Vadgaon Maval

वडगाव हे मावळ तालुक्याचे महसुली केंद्र असल्याने येथे अनेक शासकीय कामासाठी संपूर्ण तालुक्यातून सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने असतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 19, 2025
in लोकल, शहर
BJP demands immediate construction of subway or flyover at four places in Vadgaon Maval limits

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव हे मावळ तालुक्याचे महसुली केंद्र असल्याने येथे अनेक शासकीय कामासाठी संपूर्ण तालुक्यातून सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने असतात. तसेच येथील महामार्गालगत असलेले न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यामध्ये सुमारे ३ हजार विदयार्थी याच महामार्गाने ये – जा करत असतात.

आजपर्यंत सदर रस्ता ओलांडताना अनेक अपघात झालेले असून त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि नागरिकांना अक्षरश जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

या सर्व गोष्टीची दखल घेऊन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार १ सप्टेंबर २०१६ रोजी सदर महामार्गावरील अपघात स्थळांना तत्कालीन केंद्रीय परिवहन उत्तर विभागाचे अधिकार जैस्वाल साहेब , रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंता विश्वनाथ आवटे, संजय गांगुर्डे, आयआरबीचे अधिकारी, स्तुप कंपनीचे व्यवस्थापक कुलकर्णी साहेब यांनी संयुक्तीकरित्या सदर सर्व स्थळांची पाहणी केलेली आहे.

तरी वडगाव मावळ येथुन जाणारा पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. (जुना) ४ व नवीन क. ४८ या रस्त्यावर
१) वडगांव अक्षय पॅलेस हॉटेल
२) मातोश्री हॉस्पिटल
३) दिग्विजय कॉलनी ( शिवराज हॉटेल )
४) माळीनगर ( श्रीमंत महादजी शिंदे उद्यानाचे मागे )
ह्या एकूण ४ ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुल नियोजित सहा पदरी रस्त्याच्या कामामध्ये समाविष्ट करण्यात यावेत अशी मागणी वडगाव शहर भाजपाने केली आहे.

कार्यकारी अभियंता शैलजा पाटील यांना निवेदन देतांना वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर,युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे,तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर वाघमारे, मा.नगरसेवक रविंद्र काकडे, किरण म्हाळसकर , रविंद्र म्हाळसकर, युवा उद्योजक चंद्रशेखर म्हाळसकर, विकी म्हाळसकर आदी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी


dainik maval jahirat

Previous Post

आनंदाची बातमी ! ‘पीएमपीएमएल’कडून पुणे ते लोणावळा मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू । PMPML Tourist Bus Pune to Lonavala

Next Post

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची फेररचना – पाहा तुमचे गाव कोणत्या गटात आणि गणात असणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची फेररचना - पाहा तुमचे गाव कोणत्या गटात आणि गणात असणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.