Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पवन मावळ विभागातील ठाकूरसाई गावच्या हद्दीत एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (दि. १५ जुलै) घडली. या प्रकरणी महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जलदगतीने तपास करीत बाळू दत्तू शिर्के (वय अंदाजे ३५, रा.ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडिता माहेरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि निर्जनस्थळी तिच्यावर जबरदस्ती करीत लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर पीडितेला त्याच अवस्थेत सोडून आरोपीने तिथून पळ काढला. घटनेनंतर पीडित महिलेने धैर्याने पुढे येत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनीही कुठलाही ठोस पुरावा नसताना अत्यंत शिताफीने तपास करीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये शोधमोहीम राबवली आणि आरोपी बाळू शिर्के याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि त्यांच्या पथकाने केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी