Dainik Maval News : कुजगाव हद्दीत कासारसाई धरणाच्या जलाशयात बुडून एका 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पाच मित्र धरण परिसरात फिरायला आले होते. त्यात धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या एकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
रविवारी अकराच्या सुमारास हा युवक पाण्यात बुडाला होता. सोमवारी (दि. 21) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र संस्था या दोन्ही संस्थेच्या सदस्यांना यश आहे. येथे धरणाच्या जला
शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. संतोष शहाजी राऊत (वय 19, रा. साने कॉलनी, चिखली मूळगाव रा. मालेगाव, ता. केज. जि. बीड) असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्याक बुडाला असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.
वन्यजीव रक्षक मावळ व शिवदुर्ग मित्रचे निलेश गराडे, सुनिल गायकवाड, महेश मसने, राजेंद्र कडू, आकाश मोरे, अनिल आंद्रे, शुभम काकडे, विनय सावंत, अनिश गराडे, विकास दोड्डी, हर्षद काळोखे, योगेश दळवी, अजय हुगे यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी