Dainik Maval News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या स्वखर्चाने वडगाव कातवीतील रहिवाशांसाठी “मागेल त्याला, मोफत झाड” या उपक्रमांतर्गत सुमारे पाच हजार फळ, फुल व सावली देणा-या झाडांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत मोफत झाडे वाटप शुभारंभ करण्यात आला.
मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी वृक्ष संवर्धन वाढीसाठी केलेल्या संकल्पास प्रतिसाद देऊन तसेच विधानसभेच्या निवडणुकीत वडगाव शहरातून आमदार सुनिल शेळके यांना मिळालेल्या पाच हजार मताधिक्याहून अधिक मतांएवढ्या सुमारे सात हजार झाडांचे मोफत वाटप नागरिकांना करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, मा सरपंच बापूसाहेब वाघवले, मा सरपंच अर्चना भोकरे, काँग्रेस शहराध्यक्ष आबासाहेब चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ढोरे, श्रीधर ढोरे, चंदुकाका ढोरे, सतीश ढोरे, मा नगरसेविका पूनम जाधव, युवराज ढोरे, मा शहराध्यक्ष अतुल वायकर, प्रतिष्ठान उपाध्यक्षा चेतना ढोरे, गणेश जाधव आदींसह मोरया प्रतिष्ठान व मोरया ढोल पथक सदस्य, वडगाव नगरपंचायत कर्मचारी आणि वडगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडगाव कातवीतील नागरिकांनी आपापल्या परिसरात झाडे लावावीत ह्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील नागरिकांना आंबा, नारळ, फणस, चिकू, जांब, पेरू, जांभूळ, सोनचाफा, बेल, कदंब, कडुनिंब, आवळा, गुलाब , मोगरा, रातराणी, इत्यादी प्रकारची पाच फूट उंचीची झाडे विनामूल्य वाटप करण्यात आली. वृक्षसंवर्धन वाढीसाठी झाडे लावणे काळाची गरज असल्याने गेल्या अनेक वर्षापासून मागेल त्याला मोफत झाड हा उपक्रम मोरया प्रतिष्ठान माध्यमातून राबविण्यात येत असतो अशी माहिती मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी