Dainik Maval News : सह्याद्री प्रतिष्ठान मावळ व पुणे पिंपरी-चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कामशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०२ रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले. तर १७० रक्तदात्यांची रक्त तपासणी करण्यात आली.
रविवारी (दि. 27) कामशेत येथे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे उदघाटक म्हणून कामशेत शहरातील डॉक्टर उपस्थित होते. तसेच कामशेत ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली.
कामशेतमधील डॉक्टरांनी व ग्रामस्थांनी उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक करून असे समाजउपयोगी उपक्रम नेहमी राबवावेत असे मत व्यक्त केले. सह्याद्रीचे दुर्गसेवक कै. राज बलशेटवार यांच्या स्मरणार्थ मागील चार वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.
सदर रक्तदान शिबिराद्वारे रक्तदात्यांना किंवा कुटुंबियांना भविष्यात रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्त पुरविले जाते. या शिबिरासाठी मावळ तालुक्यातील सर्व दुर्गसेवक उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळा शहरात एका युवतीवर कारमध्ये विविध ठिकाणी सामुहिक बला’त्कार, एक आरोपी अटकेत । Lonavala Crime
– मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणीनंतर ठरल्या ‘नावडत्या’
– लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख 81 हजारांची फसवूणक; मावळमधील घटना, गुन्हा दाखल । Maval Crime