व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! लोणावळा शहरात एका युवतीवर कारमध्ये विविध ठिकाणी सामुहिक बला’त्कार, एक आरोपी अटकेत । Lonavala Crime

र्यटननगरी लोणावळा शहरात (ता. मावळ) शनिवारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 27, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Image


Dainik Maval News : पर्यटननगरी लोणावळा शहरात (ता. मावळ) शनिवारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. एका युवतीला जबरदस्ती कारमध्ये डांबून ठेवत तिच्यावर विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.

शनिवारी (दि. २६ जुलै) सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (दि. २५ जुलै) रात्री नऊ ते शनिवारी पहाटे दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. कारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गाडी थांबवत तीन नराधमांनी सदर तरुणीवर बला’त्कार केला असल्याचा गुन्हा लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पीडित तरुणी ही तुंगार्ली भागातील नारायणी धाम मंदिर परिसरातील रस्त्याने जात असताना एका कारमध्ये तिला तोंड दाबून जबरदस्तीने बसविण्यात आले.

त्यानंतर आरोपींनी तिचे हात पाय बांधत तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या सर्व प्रकारानंतर सदर मुलीला नांगरगाव येथील एका रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आले. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करत दुपारनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार केली आणि आरोपींच्या शोधार्थ रवाना केली. यानंतर बारा तासात या प्रकरणातील एक आरोपी निष्पन्न करत त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामाघरे यांनी माध्यमांना दिली. घटनेचा पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेला आरोपी हा मावळ तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू
– मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ कोसळलेली दगड, झाडी हटविली ; वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा
– सर्पमित्रांना स्वतंत्र ओळखपत्र, कुटुंबियांना १५ लाखांचा अपघाती विमा आदी मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? श्रावण मासात उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणीनंतर ठरल्या ‘नावडत्या’

Next Post

अतिशय दुःखद ! आंध्रा धरणात बुडून बेलज गावातील पंधरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Very sad Fifteen-year-old girl from Belaj village drowns in Andhra dam dies tragically

अतिशय दुःखद ! आंध्रा धरणात बुडून बेलज गावातील पंधरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.