Dainik Maval News : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे बुधवारी (दि. 20 ऑगस्ट) रोजी रात्री पाऊणे अकराच्या सुमारास एक अपघात झाला. अपघातात एका दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला आहे. वैभव ओसवाल (रा. तळेगाव दाभाडे) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव ओसवाल हा त्याच्या दुचाकीवरून देहूरोड येथून तळेगाव दाभाडेच्या दिशेने जात होता. सोमाटणे टोल नाक्याजवळ आल्यानंतर एका भरधाव सिमेंट मिक्सर वाहनाची (क्रमांक एमएच 11 एएल 7335) वैभवाच्या दुचाकीला धडक बसली. अपघातात वैभवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सोमाटणे फाटा टोल नाक्याजवळ रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. यामुळे बराचवेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांसह, वाहतूक विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन तो रुग्णालयात रवाना केला व वाहतूक सुरळीत केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस, 24 तासांत विक्रमी 432 मिलिमीटर पावसाची नोंद; आज शाळा, कॉलेजेस बंद । Lonavala Rain
– आनंदाची बातमी ! पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू । Pawana Dam Updates
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार