व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केल्याबद्दल शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभार मानले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 19, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Chhatrapati Shivaji Maharaj forts included in list of World Heritage Sites Shiv Sena MPs thank PM Modi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केल्याबद्दल मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभार मानले. या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडू राज्यातील एका किल्ल्याचा समावेश आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच पर्यटन, स्थानिक रोजगार आणि सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय आयुषमंत्री प्रताप जाधव, शिवसेनेचे गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रविंद्र वायकर, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा उपस्थित होते. शिवसेनेच्या खासदारांनी पगडी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन पंतप्रधान मोदी यांचा सन्मान केला. पत्र देऊन आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान राजा, रणनीतिकार आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे अनुभव आणि त्यांच्या आईच्या शिक्षणामुळे त्यांना एक कुशल योद्धा आणि कार्यक्षम प्रशासक बनण्यास मदत झाली. १६७४ मध्ये त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची पायाभरणी केली आणि “छत्रपती” ही पदवी धारण केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच १६४५ मध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य मोहीम सुरू केली. त्यांची मोहीम केवळ किल्ले जिंकणे किंवा युद्धे लढणे एवढी मर्यादित नव्हती, तर त्याचे उद्दिष्ट स्वतंत्र, न्याय्य आणि स्वावलंबी राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्थापन करणे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अत्यंत कार्यक्षम आणि न्याय्य शासन व्यवस्था स्थापन केली, जी जनकल्याणावर आधारित होती. त्यांनी शत्रूंना अनेक वेळा पराभूत करणारी लष्करी रणनीती विकसित केली. छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ल्यांचे महत्त्व समजले आणि त्यांना त्यांच्या रणनीतीचा अविभाज्य भाग बनवले. त्यांनी ३०० हून अधिक किल्ले बांधले आणि त्यांचे नूतनीकरण केले, जे केवळ निवासस्थानासाठीच नव्हे तर लष्करी मुख्यालय, शस्त्रागार आणि खजिना म्हणून देखील वापरले जात होते.

त्यांनी प्रत्येक किल्ला प्रशासकीय आणि लष्करी केंद्र म्हणून स्थापित केला. त्यांचे योगदान केवळ किल्ल्यांच्या बांधकामापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी त्यांना एक मजबूत सुरक्षा यंत्रणा म्हणून विकसित केले. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे किल्ले केवळ मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक नाहीत. तर लष्करी स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. याशिवाय, तामिळनाडूतील जिंजी किल्ला देखील या यादीत समाविष्ट आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील समृद्ध मराठा वारसा अधोरेखित होईल. ज्यामुळे राज्यातील लोकांचा त्यांच्या इतिहासाबद्दल अभिमान आणि जागरूकता वाढेल. हे किल्ले इतिहासाचे विद्यार्थी आणि संशोधकांसाठी महत्त्वाचे अभ्यासस्थळ बनतील, ज्यामुळे शैक्षणिक पर्यटनालाही चालना मिळेल. या उपक्रमामुळे या किल्ल्यांच्या संवर्धन, जीर्णोद्धार आणि देखभालीला प्रोत्साहन मिळेल, जेणेकरून या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व दीर्घकाळ टिकून राहील.

हे किल्ले जागतिक नकाशावर आल्यामुळे, जगभरातील पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची प्रेरणा मिळेल, ज्यामुळे महाराष्ट्र राज्य पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र बनून देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत राहील, असे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्हा घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, मावळात रात्रीपासून जोरदार पाऊस
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली, पोलिसांचे सपशेल दूर्लक्ष । Maval News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी


dainik maval jahirat

Previous Post

आनंदाची बातमी ! पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू । Pawana Dam Updates

Next Post

लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस, 24 तासांत विक्रमी 432 मिलिमीटर पावसाची नोंद; आज शाळा, कॉलेजेस बंद । Lonavala Rain

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala Rain Updates

लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस, 24 तासांत विक्रमी 432 मिलिमीटर पावसाची नोंद; आज शाळा, कॉलेजेस बंद । Lonavala Rain

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.