व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आनंदाची बातमी ! पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू । Pawana Dam Updates

मावळ तालुक्यातील अनेक खेडी आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांची वर्षभराची पाण्याची चिंता दूर झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 19, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Pavana dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अनेक खेडी आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांची वर्षभराची पाण्याची चिंता दूर झाली आहे. मावळातील गावखेड्यांसह पिंपरी-चिंचवड शहराला पाण्याचा पुरवठा करणारे प्रमुख पवना धरण आजमितीस (दि. 19 ऑगस्ट) 99.70 टक्के जवळपास शंभर टक्के भरले असून नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

पवन मावळ परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पवना धरण क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरू असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. तसेच धरण देखील शंभर टक्के भरले असल्याने धरणाचे सहाही दरवाजे उघडून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पवना नदीची पाणीपातळी वाढली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारी बारा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरण क्षेत्रात सकाळपासून 31 मि.मी. पाऊस झाला आहे, तसेच धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने धरणात पाणी सतत येत आहे. त्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे सहाही दरवाजे उघडले असून धरणाच्या सांडव्यावरून 4320 क्युसेक तर विद्युतगृहातून 1400 क्युसेक असा एकूण 5720 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पावसाचा अंदाज लक्षात घेता आणि पाण्याचा येवा लक्षात घेत धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो. नागरिकांनी खबरदारी बाळगावी. नदीकाठच्या नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसेच नदीपात्रापासून दूर राहावे, असे आवाहन व सुचना धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्हा घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, मावळात रात्रीपासून जोरदार पाऊस
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली, पोलिसांचे सपशेल दूर्लक्ष । Maval News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी


Previous Post

घोणशेत ग्रामपंचायत हद्दीतील वाउंड येथील रस्त्याचे भूमिपूजन । Maval News

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj forts included in list of World Heritage Sites Shiv Sena MPs thank PM Modi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.