लोणावळा जवळील तैलबैल हा सुळका पर्यंटकांना नेहमीच आकर्षित करतो. ट्रेकर्ससाठी तर हे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. मात्र, अनेकदा काही ट्रेकर्स हे पुरेशी साधणं जवळ न घेता या सुळक्याची चढाई करतात आणि अशावेळी अनेकदा अपघातही होतात. रविवारी तैलबैल सुळक्यावर क्लाईम्बिंग करत असताना एका 26 वर्षीय ट्रेकर्सचा खाली पडून मृत्यू झाला आहे. ( Trekkers Die After Falling While Climbing Taila Baila )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुळ उस्मानाबाद येथील सोमनाथ शिंदे (26, सध्या रा. कात्रज, पुणे) हा त्याच्या मित्रांसोबत तैलबैल सर करण्यासाठी आला होता. एकूण सहा जणांचा ग्रुप होता. ही 6 लोकांची टीम काल (शनिवार) रोजी गावात राहिले आणि रविवारी सकाळी 5:30 वाजता त्यांनी ट्रेक चालू केला आणि 6:30 च्या दरम्यान क्लाईम्बिंग सुरु केल्यानंतर आवश्यक ती साधणे जवळ न बाळगल्याने (lack of proper equipment) सोमनाथ खाली पडला, यात त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती शिवदूर्ग मित्रमंडळ लोणावळा ( Shivdurg Mitra Mandal Lonavla ) यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. राजेंद्र कडु, महेश मसने, सुनिल गायकवाड, सुरज वरे, योगेश उंबरे, प्रणय अंबुरे, रतन सिंग, आदित्य पिलाने, हर्षल चौधरी, सिद्धेश निसाळ, सिद्धार्थ अढाव यांनी गावातील मदत करणारे कार्यकर्ते अक्षय रोकडे, सुनील वरे, विनोद राऊत, मनीष माडवे, ज्ञानेश्वर मेने यांच्या साथीने मृतदेह सुरक्षितरित्या रेस्क्यू केला. ( Trekkers Die After Falling While Climbing Taila Baila )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ परिसरात पावसाची अचानक एन्ट्री, अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ
– पुणे जिल्ह्यातील 500 स्वयंसेवकांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, सर्व तालुक्यांमधून नावनोंदणी करण्याचे आवाहन