Dainik Maval News : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर कामशेत हद्दीतील कामशेत खिंड भागात मंगळवारी (दि. ९ ) रात्री एका व्यावसायिकाला अडवून मारहाण केल्याची आणि लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदर व्यक्तीने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भालचंद्र लहू काटावडे (वय 42 रा. अजिवली, ता. खालापूर, जि. रायगड) असे लुटल्या गेलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. काटावडे हे मंगळवारी कात्रज येथून आपल्या दुचाकीवरून गावी आजिवली (ता. खालापूर) येथे जात असताना कामशेत खिंडीत त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.
आरोपींनी भालचंद्र काटावडे यांची दुचाकी अडवली, त्यांना खाली उतरवून दमदाटी आणि मारहाण केली. त्यानंतर त्यांची दुचाकी, जवळील मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला अशी फिर्याज काटावडे यांनी दिली आहे.
कामशेत पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पीएसआय शेडगे हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. दरम्यान वर्दळीच्या या महामार्गावर कामशेत खिंड भागात रात्रीच्या वेळी अंधार असतो. याचाच गैरफायदा घेत सामान्य नागरिकांसोबत असे गंभीर प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित