Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या राजकीय इतिहासातील सर्वांत मोठे पक्षांत आज (दि. १५) पाहायला मिळाले. मावळ तालुक्यातील जुणे जाणते नेतृत्व बापूसाहेब भेगडे यांच्या समर्थकांचा मोठा गट आज (सोमवार, दि. १५ सप्टेंबर) भाजपवासी झाला. रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनुसार सोमाटणे फाटा (ता. मावळ) ते मुंबई पर्यंत भव्य रॅली काढून शेवटी भाजपा पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये रामदास काकडे, बाबुराव वायकर, सुभाष जाधव, किशोर भेगडे, सचिन घोटकुले या प्रमुख नेत्यांचा समावेश असून यांच्यासह आतिष परदेशी, संग्राम काकडे, शिवाजी आसवले, संतोष मुऱ्हे, प्रवीण काळोखे, तुषार भेगडे, अरूण माने, अरूण चव्हाण, तनुजा जगनाडे अशा इतरही प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे.
सोमवारी (दि. १५) दुपारी हा पक्षप्रवेशाचा सोहळा भाजपा पक्ष कार्यालयात पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह नवनाथ बन, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदीप कंद, रवींद्र भेगडे, गणेश भेगडे, भाऊ गुंड, भाजपाचे मावळमधील मंडल प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. पक्ष प्रवेश झाल्यानंतर सर्व प्रमुख नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांनी भाजपा पक्षाच्या वाढीसाठी मावळात प्रयत्न करण्याचा विश्वास दिला.
बापूसाहेब भेगडे यांची भूमिका गुलदस्त्यात :
दरम्यान मावळमधील बापूसाहेब भेगडे यांच्या समर्थकांचा जाहीर पक्षप्रवेश झाल्यानंतर बापूसाहेब भेगडे यांचा प्रवेश मात्र अजून न झाल्याने चर्चांना उधान आले आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार बापूसाहेब भेगडे हे बाहेरगावी असल्याने ते मावळात आल्यावर मोठ्या सोहळ्यासह ते भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांची यादी :
रामदास काकडे, बाबुराव वायकर, सुभाष जाधव, किशोर भेगडे, सचिन घोटकुले, आतिष परदेशी, संग्राम काकडे, शिवाजी आसवले, संतोष मुऱ्हे, प्रवीण काळोखे, तुषार भेगडे, अरूण माने, अरूण चव्हाण, तनुजा जगनाडे, बॉबी डिका, बाजीराव वाजे, कैलास खांडभोर, प्रवीण काळोखे, जयेश मोरे, गिरिष कांबळे, साईनाथ मांडेकर, शरद कुटे, दिलीप राक्षे, विशाल पवार, सचिन भेगडे, भाऊसाहेब मावकर, समीर कोयते, विक्रांत बुट्टे, सचिन भुम्बक, कैलास गायकवाड, चंद्रकांत प्रचंड, बापू दरेकर, समीर सतुल, नंदकुमार गराडे, सतीश भेगडे, रामदास ठोंबरे, सोपान भांगरे, शंकर भेगडे, अशोक भांगरे, मुरलीधर गराडे, सोमनाथ पिंगळे, रमेश जाचक, नितीन जांभळे, बापू उर्फ विशाल कदम, अभिजित काळोखे, संदीप पठारे, रविंद्र घोटकुले, बाळासाहेब काजळे, सुनील काजळे, काळुराम लालगुडे, आनंता ढवळे यांसह इतरही अनेकांनी भाजपात प्रवेश केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News