Dainik Maval News : राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची आज (दि. 15) लोणावळा बसस्थानकाला भेट देवून परिसराची पाहणी केली. यावेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया,आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बसस्थानक येथील प्रसाधनगृहाची पाहणी उपहारगृहालाही भेट दिल्यानंतर सरनाईक म्हणाले, मंत्री महोदय भेट देणार आहेत म्हणून केवळ एका दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका, प्रवाशांना दररोज स्वच्छ, टापटीप बसस्थानक, निर्जंतूक प्रसाधनगृहे आणि वाजवी दरामध्ये खाद्यपदार्थ मिळतील असे उपहारगृह असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्थानिक एसटी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी दिले.
यावेळी सरनाईक यांनी बसस्थानकावर प्रतिक्षालयात असलेल्या प्रवाशांशी संवाद साधला असता काही प्रवाशांनी लोणावळा बसस्थानकावर वेळापत्रकानुसार नियोजित बसेस येत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ बसची वाट बघावी लागते, अशी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत, पुणे प्रादेशिक व्यवस्थापकांनी सर्व बसेस वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावर आल्या पाहिजेत, अशी सूचना संबंधित आगार व्यवस्थापक यांना देण्याच्या सूचना सरनाईक यांनी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News