Dainik Maval News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ रोजी ७५ वा वाढदिवस आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
सर्वसाधारणपणे राष्ट्र प्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेश, ऑपरेशन सिंदूर, पर्यावरण हे या स्पर्धांचे विषय असणार आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.
तालुका आणि जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या निबंध व चित्रकला स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र/प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena