व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ह्युंदाई कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; तळेगाव येथील वृक्षारोपण मोहीम, रस्ते सुरक्षा उपक्रमाचा शुभारंभ

ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 16, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Hyundai should invest more in maharashtra and increase employment generation CM Devendra Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील (तळेगाव दाभाडे) प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत केले.

ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, कंपनीचे कार्यकारी संचालक जिओन्जीक ली, उपाध्यक्ष (वित्त) सारावनन टी, सहायक उपाध्यक्ष पुनीत आनंद, कार्तिक एल, वरिष्ठ व्यवस्थापक विनोद बनसोड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंपनी राज्यात सामाजिक उत्तरदायित्वअंतर्गत विविध कामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी देत आहे. ही बाब स्तुत्य असून या निधीतून राज्यात सुरू असलेली कामे पथदर्शी ठरतील. या निधीतून कंपनीने पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत रस्ता सुरक्षा, चालक प्रशिक्षण आदींमध्ये काम करावे. राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करून उद्योगांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण करीत कंपनीच्या गुंतवणुकीसंदर्भातील माहिती दिली. पुणे येथील प्रकल्पाच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील वृक्षारोपण मोहीम, रस्ता सुरक्षा उपक्रम आदींचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena


Previous Post

Acharya Devvrat : आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध आणि चित्रकला स्पर्धा । PM Narendra Modi Birthday

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध आणि चित्रकला स्पर्धा । PM Narendra Modi Birthday

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.