Dainik Maval News : आगामी सण, उत्सव व होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने शांतता राहावी व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता वडगाव मावळ पोलिसांच्या वतीने शहरात रूट मार्च काढण्यात आला होता. बुधवार (दि. १७ सप्टेंबर) रोजी हा रूट मार्च काढण्यात आला. वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तहसील ऑफीस, पंचायत समिती चौक, कोर्ट, पोटोबा मंदिर जामा मस्जिद, चावडी चौक असा हा रूट मार्च काढण्यात आला.
आगामी सण, उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जनतेमध्ये सुरक्षतेची व विश्वासाची भावना कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच भविष्यातील करावयाचे कारवाई यासंदर्भात परिचय होण्याच्या दृष्टीने स्थानिक पोलीस दल आणी केंद्रीय सशस्त्र दल यांना स्थानिक परिसराची माहिती होण्यासाठी परिचय अभ्यास दौऱ्याच्या अनुषंगाने रॅपिड ऍक्शन फोर्स C /102 बटालियन, नवी मुंबई व वडगाव मावळ पोलीस स्टेशन असे संयुक्त रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्चमध्ये वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे तीन अधिकारी तसेच आरएएफचे दोन अधिकारी व 50 सशस्त्र जवान सहभागी झालेले होते, अशी माहिती वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुमार कदम यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena
