Dainik Maval News : मावळ तालुक्यात वारकरी परंपरेला चालना मिळावी, प्रवचनकार, कीर्तनकार आणि मृदुंगमणी घडावेत तसेच युवा पिढी संस्कारक्षम तयार व्हावी, या उद्देशाने मावळ तालुक्यात स्वतंत्र वारकरी भवन उभारण्याची मागणी मावळ तालुका दिंडी समाजाने केली आहे.
यासंदर्भात मावळ तालुका दिंडी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “मावळ तालुक्यातील वारकरी परंपरा ही पांडुरंगभक्ती व संतवाङ्मयाची परंपरा जपणारी आहे. या परंपरेला भक्कम पाया मिळावा, भावी पिढ्यांमध्ये संस्कारांचे रोपण व्हावे याकरिता स्वतंत्र वारकरी भवनाची गरज आहे.”
तसेच, “आळंदी येथील धर्मशाळेतील जुन्या इमारतीला नूतनीकरणासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा.” निवेदन सादर करताना मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष महादू सातकर, सचिव नारायण ठाकर, खजिनदार सागर भसे, कार्याध्यक्ष अशोक राऊत, सल्लागार रोहिदास महाराज धनवे, तसेच राजाराम शिंदे, लक्ष्मण बालगुडे, प्रदीप हुलावळे, दत्तात्रेय पडवळ, बाबाजी महाराज काटकर, गणेश काजळे, सदाशिव विकारी, बाळासाहेब जांभुळकर, वसंत शिळवणे, बाळासाहेब सातकर, बबन शेवाळे, मधुकर गायकवाड, माऊली जांभुळकर उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन त्यांना हे हे निवेदन दिले. वारकरी परंपरेचे संवर्धन, तसेच समाजातील तरुणाईला योग्य दिशा मिळावी, यासाठी वारकरी भवन उभारण्याची मागणी तातडीची असल्याचे दिंडी समाजाने नमूद केले आहे. आमदार शेळके यांनीही वारकऱ्यांच्या भावना व मागणी लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया
