Dainik Maval News : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यामध्ये आज अखेर एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
जुन्नर तालुक्यात २ हजार ९८६, पुरंदर २४०, वेल्हा ३७९, भोर ३२१, बारामती ३०८, इंदापूर १५६, आंबेगाव १ हजार ९९६ , शिरुर १ हजार ७७, खेड १५९, मावळ २७३, मुळशी २८२, हवेली १६५, पिंपरी-चिंचवड ५, लोणी काळभोर १८५ आणि दौंड २३८ तालुक्यात असे एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
पाच हजाराहून अधिक रस्त्यांचे सांकेतांक निश्चित :
जुन्नर तालुक्यात ३ हजार ५५६, पुरंदर ८, वेल्हा ५, भोर ९७, बारामती ११, इंदापूर १५६, आंबेगाव ४५ , शिरुर ९३६, खेड ७३, मावळ ४, मुळशी ४, हवेली ४, पिंपरी-चिंचवड ५, लोणी काळभोर ८ आणि दौंड १५९ तालुक्यात असे एकूण ५ हजार ७१ शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
रस्ता लोकअदालतीत शेत रस्त्यांबाबत ८९ प्रकरणे निकाली :
जुन्नर तालुक्यात ४, पुरंदर ८, वेल्हा ७, भोर ६, बारामती ११, आंबेगाव २९ , शिरुर ८०, खेड ११, मावळ १२, मुळशी १२, हवेली १५, आणि दौंड ९ असे एकूण २०४ रस्ता लोकअदालतीचे आयोजन करुन शेत रस्त्यांबाबत एकूण ८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.
शेतीवर जाण्याकरिता रस्ता उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांकडून एकूण २६५ संमतीपत्र घेण्यासह एकूण ४१४ शेतरस्त्यांची मोजणी व सिमांकन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम