Dainik Maval News : प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी (दि. २४) बंगळुरू येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. एस. एल. भैरप्पा यांना बेंगळुरू येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, भैरप्पा यांना दुपारी २:३८ वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भैरप्पा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांना श्रद्धांजली :
काळाच्या कसोटीवर टिकणाऱ्या अद्वितीय साहित्यकृतींची निर्मिती करून भारतीय साहित्यविश्वाला समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने साहित्य, तत्वचिंतनाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रख्यात कादंबरीकार, ज्येष्ठ साहित्यिक, पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, भैरप्पा यांनी आपल्या वैविध्यपूर्ण विषयांवरील कादंबऱ्यांनी भारतीय साहित्यात मोलाची भर घातली. भारतीय संस्कृती आणि समाजजीवनाचा अचूक वेध घेणारी, मर्मभेदी लेखनशैली त्यांची ओळख होती. यातून त्यांनी कादंबरी या साहित्यप्रकाराला वलय प्राप्त करून दिले. त्यांच्या कन्नड साहित्यकृतींची विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली. त्यांनी वीसहून अधिक कादंबऱ्या, अनेक निबंध, कथा, समीक्षाग्रंथांचे लेखन केले. त्यांच्या इंग्रजीतील पुस्तकांनाही वाचकांची पसंती मिळाली. वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि भारतीय साहित्यविश्वात आपल्या लेखन सौदर्यांने आगळ्या दृष्टिकोनाची भर घालणारे लेखक म्हणून भैरप्पा अजरामर ठरतील.
Deeply saddened by the passing of Shri S.L. Bhyrappa ji.
A fearless mind who gave India timeless works that stirred hearts and inspired minds. His voice will continue to guide generations in understanding our culture and society.
Heartfelt condolences to his family and admirers.… pic.twitter.com/eumkLsxjkC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 24, 2025
भारतीय साहित्य विश्वात आपल्या लेखनशैलीने अनोखा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, तत्वचिंतक व प्रख्यात कादंबरीकार पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने साहित्य आणि तत्वचिंतनाच्या क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भैरप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री पवार म्हणतात, “एस. एल. भैरप्पा यांनी आपल्या वैविध्यपूर्ण व मर्मभेदी कादंबऱ्यांमधून भारतीय संस्कृती व समाजजीवनाचा वास्तवदर्शी वेध घेतला. त्यांच्या कन्नड कादंबऱ्यांना देशभरातील वाचकांनी उचलून धरले. विविध विषयावरील कादंबऱ्या, निबंध, समीक्षाग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय साहित्य विश्वाला समृद्ध केले. त्यांचे लेखन भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. शिक्षण क्षेत्रासाठीही त्यांचे योगदान मोलाचे आहे. भैरप्पा यांचा परखड दृष्टिकोन आणि टोकदार साहित्यिक शैली हीच त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो,” या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भैरप्पा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय साहित्यविश्वात आपल्या लेखन शैलीनं अनोखा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, तत्वचिंतक व प्रख्यात कादंबरीकार पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांच्या निधनानं साहित्य विश्व आणि तत्वचिंतनाच्या क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.… pic.twitter.com/wbdZnaR1q5
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 24, 2025
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम