Dainik Maval News : बेकायदेशीररित्या विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23 सप्टेंबर) देहूरोड येथील शिवाजीनगर येथे करण्यात आली.
कार्तिक सुनील कुंभार (23, देहूरोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शुभम बावणकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर देहूरोड येथे एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कार्तिक कुंभार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 31 हजार 550 रुपये किमतीचा 631 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम