Dainik Maval News : पैशांच्या वादातून मारहाण करीत एका इस्टेट एजंटकडून जबरदस्तीने पैसे आणि मोबाईल हिसकावून घेतले. ही गंभीर घटना दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री तळेगाव दाभाडे येथील सुमा आदित्य हॉटेल, सोमाटणे फाटा येथे घडली.
याप्रकरणी स्वप्नील अरुण लांडे (वय 35, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मयूर सुहास मुऱ्हे (वय 33, सोमाटणे गावठाण, तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील आणि त्यांचा मित्र सुनील चव्हाण हे जेवण करत असताना आरोपी तेथे आला. त्याने फिर्यादीच्या दुचाकीच्या बदल्यात घेतलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपीने फिर्यादीच्या शर्टच्या खिशातून 3,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, कमरेला खोचलेला कोयता बाहेर काढून हवेत फिरवत “दोन दिवसांत राहिलेले पैसे मिळाले नाहीत तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूदत आहे.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम