Dainik Maval News : लोणावळा-खंडाळा या राज्यातील महत्वाच्या पर्यटन केंद्रातील कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने बायो-CNG प्रकल्पाच्या आराखड्याला हिरवा कंदील मिळाला आहे.
लोणावळा शहरात सध्या दररोज सुमारे ७० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. ओला, सुका, प्लास्टिक आणि ई-कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने विभाजन करून प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक केंद्र उभारण्यात येणार आहे. जुन्या डंपिंग यार्डमध्ये साचलेला जवळपास १ लाख मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत लोणावळा-खंडाळा शहराला स्वच्छ पर्यटन शहर बनविणे, बायो-CNG आधारित आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारणे, जुन्या डंपिंग यार्डचे उच्चाटन करणे, १०० टक्के दैनंदिन कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन, महाराष्ट्रासाठी आदर्श हिल-टाउन मॉडेल विकसित करणे बाबत चर्चा झाली.
या प्रकल्पासाठी राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, “लोणावळा-खंडाळा हे पर्यटन केंद्र म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध आहे. स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांद्वारे या शहराची प्रतिमा अधिक उंचावण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरणार आहे.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम