लम्फी आजाराने ( Lumpy skin disease ) देशात अनेक राज्यातील पशुधनाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून आता राज्यातही अनेक जिल्ह्यात या चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. कार्ला ( Karla ) येथे पशुवैद्यकीय विभागाकडून ( Veterinary Department ) लम्फी आजारापासून बचाव होण्यासाठी तब्बल 130 जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
एकुण 130 जनावरांपैकी गाय वर्ग – 110, म्हैस वर्ग – 20 असे एकूण 130 पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. यावेळी कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे ( Deepali Hulavle ) , उपसरपंच किरण हुलावळे, ग्रामपंचायत सदस्या भारती मोरे, उज्वला गायकवाड, अभिषेक जाधव, पोलिस पाटील संजय जाधव हे पदाधिकारी उपस्थित होते. तर, लसीकरण पशुवैद्यकीय अधिकारी सीमा वाघमारे, अविनाश वाघमारे हे उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लम्पी रोग हा त्वचा रोग केवळ गोवंश आणि महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग असल्याचे दिसून येत आहे. कीटकांपासून हा रोग पसरतो. जनावरांपासून माणसांमध्ये या आजाराचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे तसे कारण नाही. लम्पी चर्मरोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरीही पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन जनावरांबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ( Lumpy Skin Disease Preventive Vaccination Of Cow And Buffalo By Veterinary Department )
अधिक वाचा –
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पुरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
ई-पीक पाहणी नोंदवण्याची अंतिम तारीख जवळ; मावळात शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नोंदणीचे प्रशिक्षण