दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी रात्रीच्या सुमारास जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटातील मॅजिक पॉईंट जवळ विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला. सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची बस परतीच्या मार्गावर असताना अपघातग्रस्त झाली. यात 41 विद्यार्थी जखमी झाले, तर दोन विद्यार्थ्यांना त्यांचे प्राण नाहक गमवावे लागले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या पार्श्वभूमीवर आता आरटीओ प्रशासनाने महामार्गावरून सहलीसाठी निघालेल्या बसमधील विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान कोणती काळजी घ्यावी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा कसा प्रयत्न करावा, याबद्दल प्रबोधन केले. बसमध्ये प्रथमोपचार पेटी कुठे असते, प्रवास करताना हुल्लडबाजी न करता सीट वर बसून राहणे योग्य असते, अशा अनेक सुचना अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आणि सहशिक्षकांना दिल्या. ( Guidance of RTO officials to students and co-teachers leaving for the trip )
View this post on Instagram
आपत्कालीन प्रसंगी कोणता मार्ग सुरक्षित बाहेर पडण्यासाठी योग्य असतो, याबद्दल प्रात्यक्षिकासह प्रबोधन केले. त्यासोबत बसचालक आणि शिक्षक वर्गाला देखील योग्य मार्गदर्शन केले. एकंदरीच अपघात होऊ नये, यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे. विवेक भीमनवार – परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली अभय देशपांडे – परिवहन उपायुक्त सदर अभियान सर्वच महामार्गावर राबवत आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, सहा सैनिक जखमी
– मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, थेट मुंबईत येऊन… । Sharad Pawar Gets Death Threat