Dainik Maval News : कान्हे ग्रुप ग्रामपंचायत मधील येवलेवाडी गाव हे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्मशानभूमीविना आहे. येवलेवाडी गावाला अद्याप स्मशानभूमी नसल्याने गावात जर कुणी मृत पावले तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना चार किलोमीटर दूर जावे लागते. अशावेळी अंत्यविधीस आलेल्या पाहुणे मंडळी, नातेवाईक यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मरणानंतरही मृतदेहाला मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.
गावाला स्मशानभूमी नाही. मात्र स्वतः ग्रामस्थही याबाबत पुढाकार घेताना दिसत नाही. सध्या जिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत, ती जागा वन विभागाच्या क्षेत्रात असल्याने तिथे जाण्याचा मार्ग हा खाजगी मालकाने बंद केल्यामुळे येवलेवाडी येथील नागरिकांना चार किलोमीटरचा आवळसा घालून अंत्यविधी करावा लागत आहे.
स्मशानभूमी असावी पण दुसऱ्याच्या जागी
स्मशानभूमी असावी पण दुसऱ्याच्या जागेत, या उक्तीप्रमाणे गावात कुणीही आपली जागा स्मशानभूमीला द्यायला तयार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर आपल्या जागेशेजारी स्मशानभूमी झाल्यास आपल्या जागेची किंमत कमी होईल, यामुळे कुणी स्मशानभूमीला जागा देऊ करीत असेल तर विरोध होत असल्याचे सत्यही ग्रामस्थांनी बोलून दाखविले. एकंदरीत जागा आणि पैशाच्या विचारात स्मशानभूमी अडकल्याचे दिसते.
पादंन रस्त्यावर धनदांडगांचे अतिक्रमण
पूर्वी येवलेवाडी नायगावला जोडला जाणारा पांदन वहिवाटी रस्ता होता, असे तेथील जेष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. हा रस्ता बंद झाल्याने चार किलोमीटरचा वळसा घालून नायगाव जावे लागत आहे.
अंत्यविधीला पुढार्यांची भाषणे, मात्र स्मशान भूमीकडे दुर्लक्ष
येवलेवाडी गावाला स्मशानभूमी नसल्याने तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. मात्र गावातील स्थानिक पुढारी केवळ भाषण करतात, काम मात्र काही नाही करीत, असा प्रश्न तेथील नागरिक उपस्थित करत आहे.
येवलेवाडी गावला स्मशान भुमी नसल्याने अंत्यविधी करताना गैरसोय होत आहे. येवलेवाडी ला स्मशानभूमी नसल्याने चार किलोमीटरचा वळसा घालून अंत्यसंस्कार करावे लागत आहे. तर काही वेळेस मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. गावातील नेतेमंडळी, ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सोमनाथ येवले (स्थानिक नागरिक) यांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल