Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या राज्यव्यापी शिक्षक संघटनेच्या पुणे जिल्हा ग्रामीणची २०२५ ते २०२८ त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या त्रैवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निलेश काशिद (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर) व जिल्हा कार्यवाहपदी महेश शेलार (विद्या विकास मंदिर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय,शिरूर) यांची बिनविरोध निवड झाली.
शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीणच्या निवडणूक कार्यक्रमाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोहन ओमासे शिरूर यांनी काम पाहिले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, शिरूर तालुका अध्यक्ष प्रवीण आढाव, तालुका कोषाध्यक्ष सचिन रासकर यांचे सहकार्य लाभले.
बिनविरोध निवड झालेली जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे;
निलेश काशिद (अध्यक्ष), महेश शेलार (कार्यवाह), अशोक दहिफळे (उपाध्यक्ष), अरविंद गवळे (उपाध्यक्ष), अर्जुन माळवे (कोषाध्यक्ष), संगीता रिकामे (महिला आघाडी प्रमुख), राजेंद्र भांड (कार्याध्यक्ष), संजीव मांढरे (कार्याध्यक्ष), दत्तात्रय पाटील (सहकार्यवाह), प्रमोद काकडे (सहकार्यवाह), धनकुमार शिंदे (संघटन मंत्री), राजेंद्र बढे (संघटन मंत्री), कैलास कर्पे (कार्यालय मंत्री), उमेश कसबे (कार्यालय मंत्री), जितेंद्रकुमार थिटे (प्रवक्ता), उर्मिला मांढरे (महिला प्रतिनिधी), सारिका गायकवाड (महिला प्रतिनिधी), जिल्हा कार्यकारणी सदस्य, विजय साळवे (आंबेगाव), उत्तम खेसे (खेड), प्रशांत कदम (पुरंदर), विजयकुमार वाकडे (भोर), योगेश गोसावी (मुळशी)
नूतन कार्यकारिणीचे शिक्षक परिषद राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य कार्याध्यक्ष व पुणे विभाग माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे, माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी अभिनंदन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल