Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार हे शनिवारी (दि. 27 ) मावळ दौऱ्यावर आले होते. मावळ तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी खास बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यकर्ता संवाद बैठकीत युगेंद्र पवार यांनी पक्ष, संघटन, आगामी निवडणुका याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
वडगाव मावळमध्ये झालेल्या कार्यकर्ता संवाद व आढावा बैठकीत युगेंद्र पवार यांनी “बारामतीमध्ये आताही मोठ्या प्रमाणात दहशत आहे. मावळात जे आमदार आहेत त्यांचे खरे बॉस बारामतीत बसले आहेत” असे एक विधान केल्याचे समोर आले असून या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलताना युगेंद्र पवार यांनी हे वाक्य बोलल्याचे किंवा वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पवार यांनी स्थानिक आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. या विधानातून युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावल्याचे दिसत आहे.
दरम्यान युगेंद्र पवार यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून मावळ तालुक्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काही दिवसांत यामुळे मावळच्या राजकारणात नवे राजकीय द्वंद्व पाहायला मिळू शकते. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून नव्या उमेदीने तालुक्यात कामाला सुरूवात केली आहे.
वडगाव येथील या बैठकीत आगामी निवडणुकांची तयारी आणि स्थानिक प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार सुनील शेळके हे काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
या कार्यकर्ता संवाद बैठकीस पुणे जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे, मावळचे तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ, पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग व प्रभारी मावळ अतुल राऊत, युवक अध्यक्ष विशाल वहिले, महिला अध्यक्षा रत्नमाला करंडे आदी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल